पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटच्या क्लिन बोल्डवर भारत-पाक चाहत्यांमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

विराट कोहली

न्यूझीलँड विरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाची दमदार वाटणारी फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर नांगी टाकली. ३.१ षटकात २ बाद १० अशी बिकट अवस्था असताना भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात आला.

World Cup : 'डोन्ट व्हरी... आम्ही कमबॅक करु'

भारतीय डावाला तो आकार देईल अशी तमाम क्रिकेट चाहत्यांना आशा होती. त्याने हा विश्वास सार्थ ठरवत डाव सावरण्यासाठी प्रयत्नही सुरु केले. मात्र भारताच्या डावाच्या अकराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोमने लयीत दिसणाऱ्या विराट कोहलीला एका अप्रतिम स्विंगवर चकवा दिला. कोहली ३ चौकारासह २३ चेंडूत अठरा धावा काढून तंबूत परतला. तो बाद झाल्यानंतर भारताला न्यूझीलँडविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. 

कोहलीच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  बोल्ड झालेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना विराट बोल्ड झाल्याचा खूपच आनंद झाला आहे. त्यांनी पाकिस्तानने सराव सामन्यात भारतापेक्षा अधिक धावा केल्या होत्या हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी विराट आणि  पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम यांची तुलना करताना दिसते. मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांनी पाक चाहत्यांच्या प्रतिक्रियेवर 'किंग नेहमी किंग' असतो अशा शब्दांत प्रत्तुत्तर दिले आहे. सामना न्यूझीलँडसोबत होता किमान आम्ही अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झालेलो नाही, असा टोमणाही एका भारतीय चाहत्याने लगावला आहे.

ICC WC 2019: 'यंदा पाक भारताविरुद्धचा खराब विक्रम मोडीत काढेल'
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Off stump uprooted Virat Kohli stunned by a de Grandhomme in swinger WATCH