पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिकीटेच नसल्यामुळे टीम इंडियाचा परतीचा प्रवास लांबला...

विराट कोहली

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर दोन दिवस उलटले तरी भारतीय क्रिकेट संघाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली नाही. भारतीय संघाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. तरीही याचा सर्वाधिक फटका संघाच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या संघ व्यवस्थापकाला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना होईपर्यंत म्हणजेच रविवारपर्यंत भारतीय संघाला मॅंचेस्टरमध्येच थांबावे लागणार आहे.

नरेंद्र मोदींकडून एकादशी आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगणारे ट्विट

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बुधवारी पराभव पत्करावा लागल्यानंतर लगेचच बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन सुरू करण्यात आले. पण विमानाची तिकीटेच उपलब्ध नसल्यामुळे अद्याप विराट कोहली आणि संघाला मॅंचेस्टरमध्ये थांबावे लागले आहे. येत्या रविवारपर्यंत तिकीटे उपलब्ध नसल्यामुळे संघाला तिथेच थांबावे लागणार आहे.

क्रिकेटच्या 'पंढरीत' इंग्लंड-न्यूझीलंड पूर्ण करणार वर्ल्ड कपचं 'रिंगण'

मॅंचेस्टरमधील ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघाचे क्रिकेटपटू उतरले होते. ते त्यांनी गुरुवारीच सोडले आहे. पण संघातील सर्व खेळाडू मॅंचेस्टरमध्येच आहेत. रविवार, १४ जुलैपर्यंत सर्व क्रिकेटपटू मॅंचेस्टरमध्येच थांबणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.