पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Cup: धोक्याची घंटा; सराव सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव

सराव सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव (AP)

आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने सहा विकेटनी पराभव केला. ढगाळ वातावरणात न्यूझीलंडच्या अफलातून स्विंग गोलंदाजीचा टीम इंडियाचा एकही फलंदाज सामना करु शकला नाही. अवघ्या ३९.२ षटकात भारताचा डाव १७९ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यिमसन (६७) आणि रॉस टेलर (७१) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ३७.१ षटकात चार विकेटच्या मोबदल्यात १८० धावा करुन विजय नोंदवला.
 
टीम इंडियाचे दोन मनगटी फिरकीपटू कुलदीप यादव (८.१ षटकात विना विकेट ४४ धावा) आणि युजवेंद्र चहल (६ षटकात ३७ धावा देत १ विकेट) यांना प्रभाव पाडता आला नाही. विल्यिमसन आणि टेलरने ११४ धावांच्या भागीदारी दरम्यान कोणतीही जोखिम घेतला नाही. भारताकडून केवळ रवींद्र जडेजानेच चांगली कामगिरी केली. त्याने फलंदाजीत चमक दाखवत ५० चेंडूत ५४ धावा केल्या. त्याचबरोबर ७ षटकांत २७ धावा देत १ विकेटही घेतली.

...म्हणून धोनीने जागा घेतल्याची कार्तिकला कधीच खंत वाटत नाही

जसप्रीत बुमराहने ४ षटकात २ निर्धाव टाकत २ धावा देत १ विकेट टिपली. त्याचा पहिला स्पेल चांगला राहिला. मोहम्मद शमीने (४ षटकात १६ धावा देत एकही विकेट नाही) योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. तत्पूर्वी बोल्टने ६.२ षटकात २६ धावा देत ४ विकेट घेतल्या. परंतु, जडेजाच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला १७५ धावांचा टप्पा ओलांडता आला. एकवेळ टीम इंडियाची अवस्था ही ८ विकेटवर ११५ धावा अशी होती. 

हा सराव सामना असल्यामुळे याचा गुणतालिकेवर परिणाम होणार नसला तरी टीम इंडियासाठी हा चिंतेचा विषय आहे. कारण या सामन्यात ज्या आघाडीवर भारताल अपयश आले आहे. त्यावर त्यांना लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. लोकेश राहल चौथ्या क्रमांकावर अपयशी ठरला. दिनेश कार्तिकचा आयपीएलमधील खराब फॉर्म येथेही कायम राहिल.

ICC World Cup: पाक गोलंदाजाचा प्रशिक्षकालाच बाउन्सर