मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान इमरान खान यांचे मुखवटे घेऊन मैदानात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रांतील संबध अधिक तणावपू्र्ण झाले आहेत. त्यानंतर भारतीय संघाने विश्वचषकात पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, अशा प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. दोन्ही देशातील तणावाचे वातावरण पाहता ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने आयसीसीने सामना पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना नरेंद्र मोदी किंवा इमरान खान यांचे पोस्टर अथवा मुखवटे सोबत आणण्यावर बंदी घातली आहे.
पाकचा 'बब्बर' विराटसारखा 'जब्बर' खेळ करण्यास उत्सुक
'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, स्टेडियममध्ये प्रवेश देताना कोणत्याही क्रिकेट चाहत्याला मुखवटे घेऊन जाऊ देऊ नये, यासंदर्भात मैदानाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. १९९२ मध्ये इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकला होता. ते माजी खेळाडू असले तरी सध्या ते पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांचे मुखवटे घालून येण्यासही बंदी करण्यात आली आहे.
पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट म्हणाला, आम्ही क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारताच्या काही सामन्यात क्रिकेट चाहते चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून संघाला प्रोत्साहित करताना दिसले होते. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अशा प्रकाराने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आयसीसीने राजकिय नेत्यांचे मुखवटे घालून प्रेक्षक गॅलरीत येण्यास बंदी घातली आहे.