पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या धीम्या खेळीवर क्रिकेट दिग्गजांंमध्ये दोन प्रवाह

धोनी आणि गांगुली

मँचेस्टरच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयात कर्णधार कोहलीसह धोनीच्या अर्धशतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. भारताने हा सामना जिंकला. पण धोनीच्या स्ट्राइक रेट संदर्भातील चर्चा काही थांबताना दिसत नाही. भारताचा माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने सचिन तेंडुलकरच्या सूरात सूर मिसळत धोनीकडून अपेक्षित खेळ होत नाही, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे धोनीचा पहिला कर्णधार सौरव गांगुलीने त्याची पाठराखण केली आहे. 

भारतीय डाव संपल्यानंतर स्टारस्पोर्ट वाहिनीवर लक्ष्मणने धोनीच्या धीम्या खेळीवर भाष्य केले. लक्ष्मण म्हणाला की,  धोनी स्ट्राइक बदलण्यात अपयशी ठरतोय यात कोणतीही शंका नाही. जलदगती गोलंदाजांना ज्या सहजतेने तो खेळत आहेत तेवढ्या सहजतेने तो फिरकीसमोर खेळत नाही. फिरकीपटूंविरुद्ध त्याच्या हालचाली धीम्या होतात. धोनीचा अनुभव आणि त्याची क्षमता पाहता त्याच्याकडून स्वाभाविकच मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा   आहे. पण त्याच्याकडून सध्या तशी खेळी होत नाही. 

ICC WC #INDvWI : टीम इंडिया @143 विंडीज ऑल आउट! भारताचा विजयी पंच

गांगुलीने मात्र पुन्हा एकदा धोनीचे समर्थन केले आहे. धोनी सध्या ज्या शैलीत खेळतोय त्यापरिस्थितीत आपण त्याच्यासोबत असायला हवे, असे गांगुलीने म्हटले आहे. यापूर्वी सचिनने धोनीच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी देखील गांगुलीने त्याची पाठराखण केली होती. गांगुलीशिवाय भारतीय संघाच्या सध्याचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनीच्या खेळीला दाद दिली आहे. तळाच्या फलंदाजांसोबत १५ ते २० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करण्याची धोनीमध्ये क्षमता असल्याचे मत कोहलीने व्यक्त केले होते. 

Video : धोनी-सरफराजच्या 'सेम टू सेम' झेलची चर्चा