पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनी म्हणतो; मी कधी निवृत्त होणार मलाच माहिती नाही, पण..

महेंद्रसिंह धोनी

मी कधी निवृत्त होणार हे मलाच माहिती नाही. पण विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधीच मी निवृत्त व्हावे असे खूप लोकांना वाटते आहे, असे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे. 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या अखेरच्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यातूनही निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. पण याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, धोनीबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही. या विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी भारतीय संघाकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत राहिल, अशी शक्यता कमी आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय धोनीने अचानक घेतला होता. त्यामुळे त्याच्या पुढील निर्णयाबद्दल काहीच सांगता येत नाही.

मराठा आरक्षण : हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी भारत आणि श्रीलंकेमध्ये पहिल्या फेरीतील अखेरचा सामना होतो आहे. भारत स्पर्धेमध्ये उपांत्यफेरीत आधीच पोहोचला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबद्दल धोनीने पहिल्यांदाच उघडपणे एखादे वक्तव्य केले आहे. महेंद्रसिंह धोनीने याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.