पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : कर्णधार फिंचसह ऑसीची विक्रमी सेंच्युरी

स्मिथ आणि फिंच

लंडन येथील किंगस्टन ओव्हलच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि कर्णधार अॅरॉन फिंचने शतकी खेळी केली. श्रीलंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत फिंचने १३२ चेंडूत १५३ धावांची दमदार खेळी केली. फिंचचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे १३ वे शतक असून श्रीलंकेविरुद्ध केलेली त्याची कारकिर्दीतील सर्वाच्च खेळी आहे. 

ICC WC 2019 : 'सुपर संडे' कोण गाजवणार! भारत, पाक की पाऊस...?

त्याच्या या शतकासह ऑस्ट्रेलियन संघाच्या नावेही एका विक्रमाची नोंद झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक २८ शतकांची नोंद झाली. या यादीत २७ शतकांसह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यानंतर श्रीलंका (२३), वेस्ट इंडिज (१७), न्यूझीलँड (१५) आणि दक्षिण आफ्रिका (१४) या संघांची वर्णी लागते.  ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना फिंचचे विश्वचषकातील हे पहिलेच शतक आहे. या यादीत रिकी पॉन्टींग अव्वलस्थानी आहे. पॉन्टींगने २००३ च्या विश्वचषकात दोन २००७ आणि २०११ च्या विश्वचषकात शतक झळकावले होते.  

ICC WC 2019: रवी शास्त्रींनी चाहत्यांना दाखवली धोनीची जर्सी

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम आहे डेव्हिड वॉर्नरच्या नावे आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत वॉर्नरने अफगाणिस्तानविरुद्ध १७८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर हेडनचा नंबर लागतो. मॅथ्यू हेडनने २०१७ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध १५८ धावांची खेळी केली होती. या यादीत फिंच १५३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर २०१७ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या अॅडम गिलख्रिस्टचा नंबर लागतो.