पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शमी ठरला भारी! वर्ल्ड कपमधील ११ सामन्यात ३१ बळी

मोहम्मद शमी

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत बुमराह आणि भुवी या प्रमुख गोलंदाजांच्या उपस्थितीत मोहम्मद शमीने आपली वेगळा ठसा उमटवला आहे. भुवी दुखापतग्रस्त झाल्यानंतर मिळालेल्या संधीचं शमीनं अक्षरश: सोनं केलं.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ४ गडी बाद करत शमीने विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलदगतीने २५ विकेट्स मिळवण्याचा टप्पा पार करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.  

भुवीच्या अनुपस्थितीत कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी दिली. या सामन्यात ४ विकेटसह त्यांनी हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला. भारताचे माजी अष्टपैलू   चेतन शर्मा यांच्यानंतर विश्वचषकात हॅटट्रिकची किमया करणारा शमी दुसरा गोलंदाज ठरला. पहिल्या दोन्ही सामन्यातील दमदार कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला संधी मिळाली. 

नाराजीचा शेवट थेट निवृत्तीनं, रायडूचा क्रिकेटला 'रामराम'

यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने एकदिवसीय कारकिर्दित ५ बळी मिळवण्याची सर्वोच्च कामगिरी नोंदवली. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शमीला केवळ १ बळी मिळवण्यात यश मिळाले. या सामन्यात त्याने ६८ धावा खर्च करत एक बळी टिपला. या सामन्यात बळी मिळवताच एक अनोखा विक्रम शमीच्या नावे झाला. विश्वचषकातील ११ सामन्यात ३१ बळी मिळवण्याचा पराक्रम त्याच्या नावे झाला. यापूर्वी जहिर खान आणि जवागल श्रीनाथ या भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी ४४-४४ बळी मिळवले होते.  

Video : #INDvBAN शमीच्या धुलाईनंतरची अप्सरा सोनालीची रिअ‍ॅक्शन!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 mohammed shami has taken 31 wickets from just 11 icc cricket world cup matches