भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या दुखापतीनंतर इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू केविन पीटरसनने भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील आगामी सामन्यांसाठी ऋषभ पंतला संघात घ्यावे, असे तो म्हणाला आहे. शिखर धवन हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांमध्ये धाकधूक सुरु झाली आहे.
Shikha OUT the World Cup.
— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 11, 2019
Get Pant on the plane ASAP.
KL Rahul to open and Pant at number 4...
ICC WC 2019 : ओ माय गॉड! धवन वर्ल्ड कप स्पर्धेतून 'आऊट'
या परिस्थितीत भारतीय क्रिकेट व्यवस्थापन मात्र फारसे चिंताग्रस्त दिसत नाही. धवनची जागा भरुन काढण्याच्या दृष्टिने पर्यायी खेळाडू संघात असल्याचा व्यवस्थापनाला विश्वास आहे. त्यामुळेच भारतीय संघाकडून अद्याप धवनच्या बदली खेळाडूबद्दल कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. शिखर धवन विश्वचषकाला मुकणार असल्याच्या वृत्तानंतर पीटरसनने ट्टिवटच्या माध्यमातून भारतीय संघाला सल्ला दिला. त्याने लिहिलंय की, "शिखर विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता लवकरच पंतला प्लेनमध्ये बसवा. लोकेश राहुलला भारताच्या डावाची सुरुवात करायला लावा. पंतला चौथ्या क्रमांकावर खेळवा."
धवनच्या दुखापतीनंतर पंत, अय्यर यांची नावे चर्चेत
भारतीय क्रिकेटच्या निवडसमितीने अंबाती रायडू, ऋषभ पंत, नवदीप सैनी, ईशात शर्मा आणि अक्षर पटेल यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले होते. त्यामुळे धवनच्या जागेवर यापैकी एकाची वर्णी लागू शकते. पंतचे नाव सर्वात आघाडीवर आहे.