पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: केदार फिट, भारतीय संघासोबत इंग्लंडला जाण्यास सज्ज

केदार जाधव

आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नईकडून खेळताना खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेला केदार जाधव दुखापतीतून सावरला आहे. तो तंदुरुस्त होऊन विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत इंग्लंडला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या साखळी सामन्यातील दुखापतीनंतर त्याला स्पर्धेतील अंतिम सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र तो फिट असून १५ सदस्यीय संघासोबत इंग्लंडला जाण्यास सज्ज असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.   

केदारला दुखापत, रायडू थ्रीडी गॉगल्सची ऑर्डर रद्द करणार?

३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी २२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. रॉबीन राउंड पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेत भारताचा पहिला सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने केदार जाधव फिट असल्याचे म्हटले आहे. केदार जाधव भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहर्ट यांच्यासोबत सराव शिबिरात सहभागी झाला आहे. केदारने ५९ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून यात ४३.४८ च्या सरासरीने त्याने १ हजार१७४ धावा केल्या आहेत तर ३४.७० च्या सरासरीसह ३४ विकेट्सही घेतल्या आहेत.

विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम घडण्याचा संकेत
 

आयपीएलच्या मैदानात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळताना केदार जाधव फारशी प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. मात्र, आगामी विश्वचषकात मिळालेल्या संधीचे तो सोनं करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 kedar jadhav recovers from shoulder injury set to leave for england report