पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WC 2019: विराट वर्ल्डकप जिंकून देईल, कपिल पाजींना विश्वास

कपिल देव आणि विराट कोहली

भारतीय संघाला पहिला विश्वचषख मिळवून देणाऱ्या दिग्गज कर्णधाराने विराट कोहलीच्या नेतृत्वावर भरवसा असल्याचे म्हटले आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटच्या नेतृवाखाली भारतीय संघ यंदा विश्वचषक जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहलीचे नेतृत्व अधिक परिपक्व झाले असून त्याचा भारतीय संघास फायदा होईल, असे ते म्हणाले.  नेतृत्वासोबतच त्याची फलंदाजीही महत्त्वाची असेल, असे कपिल पाजींनी म्हटले आहे. 

ICC WC 2019: शतक धोनीचे अन् चर्चा विराटची

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारताने पहिला विश्वचषक स्पर्धा गाजवली होती. कपिल देव यांनी १९७९, १९८३, १९८७ आणि १९८२ चारवेळा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. इंग्लंडमध्ये गुरुवारी सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी 'वर्ल्ड कप वॉरियर्स' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात कपिल देव यांनी विराटचे कौतुक केले आहे.

WC 2019 : केएल राहुलचा सराव चौथ्या क्रमांकाची 'विराट' डोकेदुखी कमी करणारा

कपिल देव यांनी लिहिले आहे की, 'इंग्लंडमधील कठिण परिस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी विराटशिवाय भारी कोणीच असू शकत नाही. चार वर्षांपूर्वी विराटचे आपण वेगळे रुप पाहिले. पण आता तो परिपक्व झाला आहे. तो संघ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतानाही आपण पाहिले. ही परिपक्वतेची झलक असल्याचे कपिल यांनी लिहले आहे. क्रिकेटची त्याची समज अधिक चांगली झाली असून तो एक चांगला कर्णधार बनला आहे. विश्वचषकात त्याची फलंदाजी आणि नेतृत्व महत्त्वपूर्ण असेल. त्याला संघातील इतर सहकाऱ्यांनीही साथ देणे महत्त्वाचे आहे. त्याच्याकडे चांगला संघ आहे.

'वर्ल्ड कप वॉरियर्स' या पुस्तकात कपिल देव यांनी विराटसंदर्भात लिहले आहे. त्याचप्रमाणे किरण मोरे यांनी धोनी तर के श्रीकांत यांनी धवन याच्यासंदर्भात लिहिले आहे.