पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : रबाडाचा कोहलीला शाब्दिक बाउन्सर!

विराट कोहली आणि कगिसो रबाडा

विराट ब्रिगेड अर्थात भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून कर्णाधार विराट कोहलीवर बाउन्सरचा शाब्दिक मारा सुरु झालाय. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने विराट कोहलीला अपरिपक्व म्हटले आहे. विश्वचषकापूर्वी कोहली आणि रबाडा आयपीएलच्या मैदानात समोरासमोर आले होते. यादरम्यानचा किस्सा शेअर करत रबाडाने विश्वचषकातील सामन्यापूर्वी कोहलीवर शाब्दिक मारा केला आहे. रबाडा म्हणाला की, "विराट हा आक्रमक खेळाडू आहे. आयपीएलच्या एका सामन्यात मी त्याला काही शब्द ऐकवले. ते त्याला अजिबात आवडले नाहीत. त्याने लगेच माझ्याजवळ येत मला सुनावले. तो आपल्याला बोललेला शब्द त्याच्याविरुद्ध वापरला तर त्याला राग येतो."  

ICC WC 2019 : स्फोटक ख्रिस गेलचा पाकविरुद्ध विक्रमी 'विस्फोट'

ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये रबाडा पुढे म्हणाला, "त्याचे ते कृत्य माझी एकाग्रता भंग करण्यासाठी असू शकते. हे लक्षण मला अपरिपक्वतेचे वाटते. तो एक चांगला खेळाडू आहे. म्हणून त्याने कोणाबद्दल अपशब्द वापरु नये. विराट कोहलीला समजणे अवघड आहे. मैदानातील आक्रमक स्वभावाचा त्याला फायदा होत असेल. पण त्याच हे वागणं मला पटत नाही. माझ्यासोबत घडलेल्या घटनेनंतर बसमधून हॉटेलकडे जात असताना हा माणूस (कोहली) मैदानात इतका आक्रमक का असतो असा प्रश्न मनात घोळत होता. तो वास्वविक रागीट आहे का? असा विचारही मनात आला. त्याची आक्रमकतेने मला काय नुकसान होणार, असे म्हणून मी विचार सोडून दिला." 

ICC चा क्रिकेट चाहत्यांना सवाल, रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा

साऊथहॅम्प्टनच्या मैदानात ५ जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात  कोहली विरुद्ध रबाडा यांच्यातील टक्कर पाहणे मजेशीर ठरेल. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 kagiso rabada labels virat kohli immature ahead of india vs south africa