पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL मध्ये लक्ष वेधणाऱ्या जोफ्राला इंग्लंडने दिले वर्ल्ड कपचे तिकीट

जोफ्रा आर्चर

आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या अष्टपैलू जोफ्रा आर्चरची इंग्लंडच्या विश्वचषकासाठीच्या १५ सदस्यीय संघात निवड झाली आहे.  इंग्लंडने यापूर्वी जाहीर केलेल्या संघात जोफ्राला संधी देण्यात आली नव्हती. मात्र, आयसीसीला २३ मे पूर्वी देण्यात येणाऱ्या अंतिम संघ यादीपूर्वी इंग्लंडने जोफ्राला संघात स्थान दिले आहे.  

...तर जोफ्राला विश्वचषकात संधी मिळेल!

नुकत्याच झालेल्या आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये आर्चरने चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. त्याच्यासोबत लियाम डॉसन आणि जेम्स विन्स यांना देखील इंग्लंड संघात स्थान मिळाले आहे. यापूर्वीच्या संघात निवडलेल्या जो डेण्टली, अ‍ॅलेक्स हेल्स आणि डेव्हिड विली यांच्या  डच्चू देत इंग्लंड क्रिकेटने या तिघांना संघात स्थान दिले. 

ड्रग्ज प्रकरणानंतर हा फलंदाज वर्ल्डकप संघातून बाद!

इंग्लंडचा विश्वचषकासाठीचा संघ
 

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, जो रूट, मोईन अली, जोफ्रा आर्चर,  टॉम कुरेन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.