पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच सामन्यानंतर दोन शतकं! स्पर्धेतील पहिले शतक जो रुटच्या नावे

जो रुट आणि जोस बटलर

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाऊस पडणार असे भाकित स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गजांनी वर्तवले होते. आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यात दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरणार असल्याचे चित्रही पाहायला मिलाले. मात्र एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नव्हती. 

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात यजमान इंग्लंडनेच वैयक्तिक शतकांचा शुभारंभ केला. इंग्लंडच्या जो रुटने संयमी खेळी करत विश्वचषकातील पहिले शतक नोंदवले. त्याने बटलरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी १३० धावांची भागिदारी केली.  जो रुटने १०४ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०७ धावा केल्या. तो संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल असे वाटत असताना शदाब खानने त्याला हाफिजकरवी झेलबाद केले. 

ICC WC 2019: भारत-श्रीलंका-पाकला जमलं नाही ते बांगलादेशनं करुन दाखवलं

दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळी करणाऱ्या यष्टिरक्षक जोस बटलरनेही ७६ चेंडूत ९ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने विश्वचषकातील दुसरे शतक आपल्या नावे केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाच सामन्यातील शतकांचा दुष्काळ मोडीत काढला. मात्र सामना रोमहर्षक स्थितीत असताना दोघेही तंबूत परतले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 Joe Root First and Jos Buttler scored hundreds while England Pakistan Match