पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : बुमराहची डोपिंग चाचणी

जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी भारताच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) घेण्यात आली. साऊथहॅम्प्टनच्या मैदानातील सरावादरम्यानच जसप्रीत बुमराह डोपिंग चाचणीला सामोरे गेला. दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या चाचणीत सर्वप्रथम युरिन टेस्टचे नुमने घेतले गेले. त्यानंतर ४५ मिनिटांनी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. 

ICC WC 2019 : या तीन समस्या भारतीय संघाची डोकेदुखी वाढवू शकतात

आयसीसीच्या स्पर्धेपूर्वी प्रत्येक खेळाडूंला उत्तेजक द्रव्य चाचणीला सामोरे जावे लागते. भारतीय क्रिकेटपटूंची ‘वाडा’च्या (World Anti Doping Agency) मार्फत उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यात येते. बीसीसीआयने बुमराहच्या चाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इतर खेळाडूंची देखील चाचणी घेतली जाणार असून याबाबत कोणतीही माहिती बीसीसीआयने स्पष्ट केलेली नाही.