पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट म्हणाला, आम्ही क्रिकेट जगतात भारी!

विराट कोहली

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मँचेस्टरच्या मैदानात होणाऱ्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करु असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.  

विराट म्हणाला की, "प्रतिस्पर्धी कोण आहे याचा फारसा फरक पडत नाही. आम्ही चांगला खेळ करुन कोणालाही पराभूत करु शकतो. पाकिस्तान विरुद्धचा सामना विशेष असा नाही. हा सामना इतर प्रतिस्पर्धी प्रमाणेच आहे. आम्ही सध्या आघाडीला आहोत. आम्ही त्याप्रमाणेच खेळ दाखवू."
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. त्यातील सलग दोन विजयानंतर न्यूझीलँडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

ICC WC 2019 : कर्णधार फिंचसह ऑसीची विक्रमी सेंच्युरी

या सामन्यात मिळालेल्या एका गुणासह भारतीय संघाच्या खात्यात ५ गुण जमा झाले आहेत. विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचे भारताचे रेकॉर्ड उत्तम असून आतापर्यंत एकदाही भारताने पाकिस्तानकडून हार स्वीकारलेली नाही. ही कामगिरी कायम राखण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ रविवारी मैदानात उतरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 INDvsPAK match Virat Kohali Says We are a top side in the world because of the cricket that we play