पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : पाकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाक पराभूत

CC World Cup 2019 West indies vs Pakistan: बाराव्या विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या आणि आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने २१.४ षटकात सर्व गडी गमावत १०५ धावा केल्या. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ७ गडी राखून अवघ्या १३. ४ षटकात पार केले. या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान संघाच्या नावे खराब विक्रमाची नोंद झाली. 

 

ICC WC 2019 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकचा मानहानीकारक पराभव

विश्वचषक स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या उभारण्याची पाकिस्तानची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ सलामीच्या सामन्यात अवघ्या ७४ धावांत आटोपला होता. विशेष म्हणजे त्यावेळी देखील त्यांना वेस्ट इंडिजच्या संघानेच गुंडाळले होते. उल्लेखनिय म्हणजे १९९२ ची विश्वचषक स्पर्धा यंदाप्रमाणे रॉबिन राउंड पद्धतीने खेळवण्यात आला होता. सलामीच्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्ताने आश्चर्यकारकरित्या ही स्पर्धा जिंकली होती.  

ICC चा क्रिकेट चाहत्यांना सवाल, रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानातील पाकिस्तानचा हा सलग ११ वा पराभव ठरला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 indies vs pakistan lowest scores for pakistan in world cup bad record