पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकविरुद्ध मैदान मारणाऱ्या टीम इंडियाला दोन दिवसांची विश्रांती

भारतीय संघ

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषकातील आपला दबदबा कायम ठेवत पाकला एकहाती नमवले. या विजयानंतर विराट ब्रिगेड दोन दिवसांची विश्रांती घेणार आहे.  दोन वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघाने रविवारी मँचेस्टरच्या मैदानात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी पराभूत केले होते. 

भारतीय संघ २२ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध पुढील सामना खेळणार आहे. यापूर्वी खेळाडू विश्रांती घेऊन ताजेतवाने होण्यावर भर देतील. या सामन्यात भारतीय संघात भुवीच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिखर धवन नंतर भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे काही सामन्याला मुकणार आहे. मात्र सध्याच्या संघातील समतोल पाहता या बाबींचा संघाच्या कामगिरीवर फारसा परिणा होईल असे वाटत नाही. 

ICC World Cup 2019 : शमीच्या खांद्यावर भुवीचे ओझे!

भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर न्यूझीलँडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. परिणामी गुणतालिकेत भारतीय संघ ७ गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा एक सामना अधिक खेळल्यामुळे ते ८ गुणांसह अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलँडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय उपांत्यफेरीत पात्रता सिद्ध करण्याच्या शर्यतीत इंग्लंडचा संघही शर्यतीत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup 2019 indian team will rest for two days after defeating pakistan at old trafford manchester