पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बड्या मोहिमेला जाण्यापूर्वी शास्त्री धोनीबद्दलही भरभरुन बोलले

रवी शास्त्री, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाने आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रवी शास्त्री यांनी संघ विश्वसनीय कामगिरी करण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त करत स्पर्धेदरम्यान धोनीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.  

शास्त्री म्हणाले की, आगामी विश्वचषकासाठी केदार जाधव पूर्णपणे फिट आहे. तो भारतीय संघासोबत इंग्लंडला जाण्यास तयार आहे. ते पुढे म्हणाले यंदाच्या विश्वचषकात धोनीची भूमिका खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. माजी कर्णधार या नात्याने त्याची संघाला मदत होईल. याशिवाय खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तुम्ही त्याने केलेले धावबाद आणि यष्टिचित (स्टंपिंग) पाहा. त्याची ही कामगिरी सामन्याला कलाटणी देणारी ठरते. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

World Cup 2019 : यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक : विराट कोहली
 

भारतीय संघाने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली भारत तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी उत्सुक असेल. विराटने यंदाची स्पर्धा अधिक आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. त्याने अफगाणिस्तानच्या संघाचा दाखला देत विश्वचषकात सहभागी असलेल्या संघानी आपल्यात चांगली सुधारणा केल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक सामन्यात ताकदिनीशी खेळावे लागेल, असे विराट म्हटले आहे. 

World Cup : द्रविड म्हणतो, हे त्रिकुट भारतासाठी 'लक फॅक्टर' ठरेल
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 indian squad for world cup 2019 ravi shastri s statement on ms dhoni before leaving for england