इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (बुधवारी) इंग्लंडला रवाना झाली. विराट कोहलीचा कारकिर्दीतील तिसरा विश्वचषक असून यंदाच्या विश्वचषकात तो भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. १९९२ नंतर यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा ही राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी असलेले दहा संघ प्रत्येक संघासोबत सामना खेळणार आहेत. म्हणजे प्रत्येक संघाला नऊ सामने खेळून उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल.
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक
- ५ जून दक्षिण अफ्रीका रोज बॉल, साउथॅंप्टन
- ९ जून ऑस्ट्रेलिया ओव्हल, लंडन
- १२ जून न्यूझीलँड ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम
- १६ जून पाकिस्तान ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- २२ जून अफगानिस्तान रोज बॉल, साउथॅंप्टन
- २७ जून वेस्टइंडीज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- ३० जून इंग्लंड एजबस्टन, बर्मिंगहॅम
- २ जुलै बांग्लादेश एजबस्टन, बर्मिंगहॅम
- ६ जुलै श्रीलंका हेडिंगले, लीड्स
भारताचे सर्व सामने हे दुपारी ३ वाजता सुरु होतील.
बड्या मोहिमेला जाण्यापूर्वी शास्त्री धोनीबद्दलही भरभरुन बोलले
प्रत्येक संघाने खेळलेल्या नऊ सामन्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना ०९ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल तर दुसरा उपांत्य सामना ११ जुलैला एजबस्टन, बर्मिंगहॅमच्या मैदानात खेळवण्यात येणार असून १४ जुलैला क्रिकेटच्या पंढरीत अंतिम सामना रंगणार आहे.
विश्वचषकासाठीचा भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.
World Cup 2019 : यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक : विराट कोहली