वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भुवीने नेट प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला पुन्हा संघात घ्यावे की अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकसह चार विकेट मिळवून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोहम्मद शमीला संघात कायम ठेवावे, असा मोठा प्रश्न कोहलीसमोर वेस्ट इंडिज विरुद्ध मैदानात उतरताना असेल.
ICC World Cup 2019 Point Table: चौथ्या स्थानासाठी चार संघ शर्यतीत
कोहलीने या परिस्थितीत कोणाला संधी द्यावी, असा प्रश्न आकाश चोप्राने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरला विचारला एका कार्यक्रमात विचारला होता. यावर सचिनने भुवीला पसंती द्यावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले. सचिन म्हणाला की, "वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी भुवी तंदूरुस्त असेल तर त्यालाच संधी मिळायला हवी. भुवीमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. तो वेस्ट इंडिजच्या आघाडीच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकतो."
Video : विंडीज विरुद्धच्या सामन्यापूर्वी भुवीचा कसून सराव
विश्वचषकात स्पर्धेतील वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले आहे. मँचेस्टरच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यात हताश वेस्ट इंडिजला नमवत भारतीय संघ विजय घोडदौड कायम राखून स्पर्धेतील दावेदारी भक्कम करण्यास प्रयत्नशील असेल. भुवी तंदूरुस्त असल्यास कर्णधार कोणाला सचिनच्या म्हणण्याप्रमाणे भुवीला संधी देणार की मोहम्मद शमीवरच भरवसा ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.