पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : धोनी-सरफराजच्या 'सेम टू सेम' झेलची चर्चा

धोनी आणि सरफराज

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने यष्टिमागे घेतलेल्या अप्रतिम झेलची सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा सुरु आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीने कार्लोस ब्रेथवेटचा अप्रतिम झेल टिपला होता. धोनीने जसा ब्रेथवेटचा झेल टिपला अगदी तसाच झेल पाकिस्तानी कर्णधार सरफराजने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात घेतला होता. 

आयसीसीने धोनी आणि सरफराजच्या झेलचा व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. दोन्ही झेलमधील अप्रतिम झेल कोणता? असा प्रश्नही आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना केला आहे. आयसीसीच्या या ट्विटनंतर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहत्यांच्यात शाब्दिक रणधुमाळी सुरु झाली आहे. 

एका नेटकऱ्याने झेल घेताना धोनीचे शरीर हवेत आहे आणि सरफराजने झेल टिपताना गुडघे जमिनीला टेकल्याचे बारीक निरिक्षण नोंदवत धोनीचा झेल सर्वोत्तम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एका नेटकऱ्याने धोनी आणि सरफराज यांच्यातील फिटनेसचे अंतर या व्हिडिओतून दिसून येते असे म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 India vs West Indies ICC Asked Fans MS Dhoni OR Sarfaraz Ahmed Whos Catch Was Better Watch Video