पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली

विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांने दक्षिण आफ्रिकेचा संघ हा धोकादायक असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीचा आफ्रिकेचा संघ समतोल आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना कमवूत समजून चालणार नाही, असे विराटने म्हटले आहे. सलामीच्या सामन्यात आमच्यातील क्षमतेवर लक्षकेंद्रीत करुन चांगली कामगिरी करु, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करत आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना हा साउथहॅम्टनच्या मैदानात रंगणार आहे. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचे रेकॉर्ड खराब असले तरी सध्याच्या घडीला आफ्रिकन संघ संघर्ष करत आहे. त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीलाच दोन सामने गमावले आहेत.  

ICC WC 2019 : आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन 'गन' निकामी

विराट म्हणाला की, सलामीच्या सामन्यापूर्वी आम्ही चांगला सराव केला आहे. साउथहॅम्टनमध्य आम्ही अगोदर पासून असल्याचा आम्हाला फायदा मिळेल. येथील परिस्थितीनुसार संघ संतुलित आहे. गोलंदाजीत चांगले पर्याय उपलब्ध असून रविंद्र जजेजा देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. खेळपट्टीचा अंदाज पाहून परिस्थितीनुसार अकरा जणांचा संघ निवडला जाईल. विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाचे असून संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला. 

विराटची आक्रमकता अंहकार नव्हे तर आत्मविश्वास'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India Vs South Africa tomorrow South Africa is a very dangerous side on their day and even with replacements Says Virat Kohli