पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : #IndvsPak वर्ल्ड कपमधील 'फाइट'पूर्वी वातावरण 'टाइट'

विराट आणि सरफराज

विश्वचषकात रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी दोन्ही राष्ट्रातील वाहिन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. ‘फादर्स डे’ दिवशी होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 'बाप बाप होता है' या डायलॉगवर आधारित जाहिरात तयार करण्यात आली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल देखील होताना दिसते. यावर काही पाकिस्तानी चाहते टीका देखील करत आहेत. 

दरम्यान भारताकडून करण्यात आलेल्या जाहिरातीला प्रत्युत्तर देताना पाकिस्ताननेही खालची पातळी गाठली आहे. त्यांनी भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांच्यासारखा दिसणाऱ्या कलाकाराला घेऊन जाहिरात केली आहे.  पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्टाइकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती.

त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला होता. त्याला प्रत्तुत्तर देताना देताना भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन यांची कसून चौकशी केली होती. त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा मारा करण्यात आला होता.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने विश्वचषकापूर्वी जाहिरात केली आहे. या जाहिरातीविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India vs Pakistan World Cup Match Social Media Debate Father Day Pak Make Abhinandan Capture Mocked In Racist Pakistani