पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : ...तरच भारतीय संघाला पराभूत करु शकाल, वकारचा पाकला सल्ला

वकार युनूस

भारतीय संघाला पराभूत करायचे असेल तर सुरुवातीला विकेट्स घेणं महत्त्वाचे आहे, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला दिला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताना चॅम्पियन्सशीप चषकातील कामगिरीतून डोक्यात ठेवून मैदानात उतरा, असेही वकार म्हणाला आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी ट्रॅफर्डच्या मैदानात सामना रंगणार आहे.  

वकारने एका लेखातून आगामी सामन्यासंदर्भात संघाला सल्ला दिला आहे. पाकिस्तान संघाला स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर त्यांना भारतीय संघाविरुद्ध सर्वोच्च दर्जाची कामगिरी करावी लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच आव्हानात्मक असतो. पाकिस्तानने चॅम्पियन्स चषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करावी, असा उल्लेखही त्याने आपल्या लेखात केला आहे. २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. 

सुंदर पिंचाईंचा क्रिकेट स्ट्रोक, वर्ल्ड कप फायनलबद्दल केली भविष्यवाणी

पाकिस्ताने मैदानात उतरताना सकारात्मक विचार घेऊन मैदानात उतरावे. सुरुवातीला विकेट घेऊन भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्नच पाकिस्तानला विजय मिळवून देवू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी ढिसाळ झाली. मोहम्मद आमिरला दुसऱ्या बाजून साथ मिळाली नाही, अशी खंतही वकारने व्यक्त केली.  

ICC WC :#AusvsPak आमीरच्या 'श्रीमंती'नंतरही पाकच्या पदरी 'दारिद्रय'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 india vs pakistan waqar younis says pakistan need to be a plus to beat india