पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#IndvsPak : सरफराजवर अंतर्गत मतभेदासंदर्भातील प्रश्नांचा मारा

सरफराज अहमद

विश्वचषकातील 'हाय-होल्टेज' सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाक कर्णधार सरफराज अहमदवर अनेक प्रश्नांचा भडिमार सुरु आहे. नाणेफेकीचा निर्णयानंतर खेळपट्टीवर ओलसरपणा असूनही क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला? मैदानात उतरलेल्या खेळाडूंमध्ये नकारात्मक भावना का होती? यासह संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या मतभेदामुळे पाकच्या पदरी पराभव पडला का? असे अनेक प्रश्नांचे बाउंन्सरला सरफराजला सामोरे जावे लागत आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करावी, असा सल्ला दिला होता. पण याकडे दुर्लक्ष करत सरफराजने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावर सरफराज म्हणाला की,  भारताने नाणेफेक जिंकली असती तर त्यांनी गोलंदजीच स्वीकारली असती हे कर्णधार विराट कोहलीनेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा निर्णय चुकीचा होता असे वाटत नाही, असे सरफराजने म्हटले आहे. गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. क्षेत्ररक्षणावेळी आमच्याकडून चुका झाल्या. रोहितला धावबाद करण्याची आम्हाला दोनवेळा संधी मिळाली. पण आम्ही त्याचा लाभ घेतला नाही. त्याला बाद करण्याची चपळाई दाखवली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता, असेही तो म्हणाला. 

#IndvsPak: पाक पत्रकाराच्या गुगलीवर हिटमॅनचा मास्टर स्ट्रोक

खेळाडूंच्या मैदानातील नकारात्मक अवस्थेबद्दलही त्याने सावध भूमिका मांडली. संघातील सर्व खेळाडू उत्साही होते. प्रत्येकाने सकारात्मकतेने खेळ केला. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात जो संघ दबाव चांगल्या पद्धतीने पेलतो तो संघ विजयी होतो. नव्वदीच्या दशकात पाकिस्तानचा दबदबा होता. पण आताच्या संघात दबावात खेळण्याची क्षमता भारतापेक्षा कमी आहे. त्यामुळे भारताने बाजी मारली, असे तो म्हणाला. 

भारतविरुद्धच्या पराभवानंतर सरफराजला ड्रेसिंगरुममध्ये वरिष्ठ खेळाडू शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांच्यासोबतच्या मतभेदावर प्रश्न विचारण्यात आला होता. हे दोन वरिष्ठ खेळाडू सरफराजच्या नेतृत्वावर नाराज असल्याचा सूर पाहायला मिळत आहे. यावर सरफराज म्हणाला की, ड्रेसिंग रुममध्ये आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. भारताविरुद्धच्या सामन्यात सरफराजने या दोघांकडून प्रत्येक एक-एक षटक टाकून थांबवले होते. या निर्णयाबद्दही त्याने स्पष्टिकरण दिले. शोएब आणि हाफिज या दोघांनी आपल्या पहिल्या षटकात प्रत्येकी ११ धावा दिल्या. भारतीय जोडी सेट झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा चेंडू सोपवला नाही, असे सरफराजने म्हटले आहे.

'डेंजर झोन'मध्ये धावणाऱ्या आमिरला पंचांनी फटकारले