पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#IndvsPak : पाकविरुद्धच्या विक्रमी विजयामागची पाच प्रमुख कारणे

पाक विरुद्ध भारतीय संघाचा दिमाखदार विजय

चॅम्पियन्स चषकातील कामगिरीचा दाखला देत ५६ इंचाची छाती असल्याचा गवगवा करणाऱ्या पाकचा फुगा पुन्हा एकदा फुटला. विश्वचषकातील आपला रुबाब कायम ठेवत विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मँचेस्टरच्या मैदानावर पाकला वर्ल्ड कप स्पर्धेत सातव्यांदा पराभूत करण्याचा पराक्रम केला.  या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पाक कर्णधाराने गोलंदाजी स्वीकारली. पण भारतीय सलामीवीरांनी संयमी खेळ करत पाक कर्णधाराचे मनसुबे अक्षरश: उधळून लावले. पाकविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे एकीचे बळ दाखवून देत विराट ब्रिगेडला हरवणे मुश्किल असल्याचे संकेत दिले आहेत.  

भारताच्या या विजयातील पाच महत्त्वाच्या कारणामध्ये फलंदाजी, गोलंदाजीसह कर्णधार विराटा कोहलीने योग्यवेळी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. एक नजर टाकूयात सामन्यातील पाच महत्त्वपूर्ण घटनांवर... 

सलामीचा धमाका

पाकविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने भारताला नुसती चांगली सुरुवात करुन दिली नाही. तर या जोडीनं वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून रेकॉर्ड ब्रेक भागीदारी रचून पाकला बॅकफूटवर टाकले. लोकेश राहुलने पाकचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरचे पहिले षटक निर्धाव खेळून काढले. आमिरच्या गोलंदाजीवर रिस्क घेऊन भारताला अडचणीत न पाडण्याचा हा एक इशाराचं होता. आमिरनं आपल्या स्पेलच्या पहिल्या चार षटकात केवळ आठ धावा देत सलामी जोडीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण विकेट सलामी जोडीनं  विकेट टिकवून ठेवत त्याला पाक गोलंदाजांना आपल्यावर हावी होण्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. या जोडीनं शतकी भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला.

पाकिस्तान संघाचं ढिसाळ क्षेत्ररक्षण

भारताच्या डावातील दहाव्या षटकात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यातील ताळमेळ बिघडल्याचे चित्र पाहायला मिळाले. वहाब रियाज घेऊन आलेल्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला धावबाद करण्याची संधी पाकिस्तानला मिळाली होती. रोहित त्यावेळी ३२ धावांवर खेळत होता.  पण पाकला या संधीचं सोनं करता आलं नाही. परिणामी त्यानंतर रोहितनं भारताच्या खात्यात १०८ धावा जोडल्या. या धावांनी पाकिस्तानच्या पराभवाचे अंतर पक्के केले. 

कोहली-रोहित यांच्यातील भागीदारी

लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर कर्णधार-उपकर्णधारांनी ९२ धावांची भागीदारी रचली. या जोडीनं पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे अक्षरश: खाली पाडले. धावगती वाढवण्याच्या नादात रोहितनं विकेट टाकल्यानंतरही कोहलीनं जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने हार्दिक पांड्यासोबत फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. पाकिस्तानी फलंदाजांना हे जमलं नाही. एका बाजूने विकेट गेल्यानंतर त्यांच्याकडून दुसरी बाजू उचलणारा फंलदाज दिसला नाही. बाबर आणि फखर झमान बाद झाल्यानंतर पाकिस्तानला कमबॅक करता आले नाही. दोन्ही संघात यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. 

विजयनं घेतलेला पहिला बळी अनमोलचं 

पाकिस्तानच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर पाचव्या षटकात भुवनेश्वरला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. सुरुवातीलाच प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्यानंतर कर्णधारासमोर हा मोठा प्रश्नच निर्माण झाला होता. पण त्याचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरने कर्णधाराचा हा प्रश्न जटील होऊ दिला नाही. विजय शंकरने आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकच्या इमान उल हक ला पायचित करत पाकला पहिला धक्का दिला. ही भारतासाठी जमेची बाजू ठरली. या सामन्यात त्याने दोन बळी टीपले. त्याच्यासह हार्दिक पांड्यानंही दोन विकेट्स घेत भारताच्या ताफ्यातील अष्टपैलूंची ताकद दाखवून दिली.  

फिरकीपटू कुलदीपनं सामना वळवला 

फखर झमान आणि बाबर आझमनं सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत पाकच्या डावाला आकार दिला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरते असे वाटत असताना कुलदीपनं बाबर आझमला चकवा देण्यात यश मिळवले. एवढ्यावरचं तो थांबला नाही तर फखर झमानलाही त्याने तंबूचा रस्ता दाखवत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या. यातून पाकला सावरता आले नाही. पावसाने यात आणखी भर घातली. पावसामुळे १० षटके कमी झाल्यामुळे पाकला ३० चेंडूत १३६ धावांचे टार्गेट मिळाले होते.  

ICC WC 2019 : नाद नाय करायचा! विराट ब्रिगेडचं 'मिशन फत्ते'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India vs Pakistan Match 22 five reasons behind indian team historical win in world cup