विश्वचषकातील भारत-पाक सामन्याची उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे. सुपर संडेला मँचेस्टरच्या मैदानात विराट ब्रिगेड वर्ल्ड कपमधील आपला परफॉमन्स कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास उत्सुक आहे. विराटने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत तसे संकेतही दिले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ICC WC 2019 : 'सुपर संडे' कोण गाजवणार! भारत, पाक की पाऊस...?
पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बाबर आझम विराट ब्रिगेडविरुद्धचे आव्हानाला सामोरे जाण्यासाठी उत्सुक आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने आपली उत्सुकता बोलून दाखवली. सामन्यापूर्वी बाबरने विराट कोहलीच्या फंलदाजीतून धडे घेत असल्याचे म्हटले आहे. बाबर म्हणाला की, "मी विराटच्या फलंदाजीचा मोठा चाहता आहे. तो वेगवेगळ्या परिस्थितीत कशा पद्धतीने आपल्या खेळीला आकार देतो हे मी बारकाईने पाहतो. त्याची फलंदाजी पाहून मी स्वत:ची फलंदाजी सुधारण्यावर भर देतो. भारतीय संघाच्या विजयात विराटचा वाटा मोठा असतो. त्याच्याप्रमाणेच मी देखील माझ्या संघासाठी चांगली खेळी करण्यास प्रयत्नशील आहे."
पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट म्हणाला, आम्ही क्रिकेट
२०१७ मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषकातील अंतिम सामन्यात आम्ही भारतीय संघाला पराभूत केले होते. हा सामना आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने मैदानात उतरु, असा विश्वास बाबरने व्यक्त केला.