पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : 'सुपर संडे' कोण गाजवणार! भारत, पाक की पाऊस...?

भारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट

विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील 'हायहोल्टेज' सामना रविवारी रंगणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाची पाकिस्तानविरुद्धची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी पाहता विराट ब्रिगेडचे पारडे जड आहे. पाकिस्तानी संघाला विश्वचषक स्पर्धेत एकदाही भारताला पराभूत करणं जमलेलं नाही. पाकविरुद्ध भारतीय संघाचा दबदबा असला तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात पाऊस चाहत्यांचा हिरमोड करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या विश्वचषकात पावसामुळे सर्वाधिक सामने रद्द होण्याची नोंद झाली असून भारत-पाक आणि पाऊस यांच्यापैकी सुपर संडे कोण गाजवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

दोन्ही संघातील खेळाडूंचा विचार केल्यास भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्याविरुद्ध मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ कोणती रणनिती अवलंबणार हे देखील महत्त्वूपूर्ण असेल. तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह इमाम उल हक आणि फखर झमा यांच्यात मुकाबला पाहायला मिळेल.पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आमिर विरुद्ध आक्रमक अंदाजात खेळण्याचा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीने मैदानात उतरताना सकारात्मकतेने उतरण्याचा मंत्र आपल्या शिलेदारांना दिला आहे.

ICC WC 2019: रवी शास्त्रींनी चाहत्यांना दाखवली धोनीची जर्सी

पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या खेळाडूंसाठी उद्याच्या सामन्यात निश्चित दबाव असेल. विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्ध चांगले रेकॉर्ड आहे. त्याच्याकडून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. सलामीच्या सामन्यात रोहित शर्मा आणि त्यानंतर शिखर धवनने शतकी खेळी केली आहे. त्यानंतर क्रिकेट चाहने रन मशिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहेत. कोहली पाकविरुद्ध शतकी खेळी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

ICC WC 2019 : ...तरच भारतीय संघाला पराभूत करु शकाल, वकारचा पाकला सल्ला

पाकिस्तानच्या ताफ्यातील हसन अली, शाहिन आफ्रिदीसाठी भारताविरुद्धचा सामना एक कसोटीच असेल. कारण त्यांना क्रिकेट जगतातील सर्वश्रेष्ठ फलंदाजीसमोर गोलंदाजी करायची आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदान फलंदाजीसाठी अधिक अनुकूल आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढू शकतात. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाटी मध्यफळीतील फलंदाजी महत्त्वपूर्ण असेल. यात महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. याशिवाय कोहली पाकविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यापैकी एकालाच संधी देऊ शकतो. ती संधी कोणाला मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.  

    
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 india vs pakistan at old trafford manchester match preview expected playing xi and picth and weather report