पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेमीफायनलमधील पराभवानंतर कोहलीचा चाहत्यांना भावनिक संदेश

विराट कोहली

मँचेस्टरच्या मैदानात लोकेश राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी  न्यूझीलंडने दिलेल्या २३९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा भारतीय संघ पराभूत होईल, असा विचार कुणाच्याही मनात आला नव्हता. पण मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्टने भारताच्या दावेदारीचा ट्रेंड अवघ्या पहिल्या ४० मिनिटांत बदलला. या दोघांनी भारताची अवस्था ४ बाद २४ अशी बिकट केली. 

विराटने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मी सर्व प्रथम भारतीय संघाला प्रोत्साहन देणाऱ्या क्रिकेट चांहत्यांचे आभार मानतो. तुमच्या- आमच्यासाठी ही स्पर्धा अविस्मरणीय अशी होती. तुम्ही सर्वांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आम्ही सर्वोपरी प्रयत्न केले. पण यश मिळाले नाही त्यामुळे निराशा आली. जय हिंद!" 

धोनीजी, निवृत्त होऊ नका! लतादीदींची भावनिक साद

आघाडी कोलमडल्यानंतर ऋषभ पंत, हार्दिक पांड्या महेंद्रसिंह धोनी यांनी रविंद्र जडेडाने संघर्षमय खेळी करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पत्रकार परिषदेत आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे पराभव स्वीकारावा लागला असे म्हणणाऱ्या विराटने सोशल मीडियावर भावनिक संदेश देत प्रोत्साहन देणाऱ्या तमाम क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup 2019 india vs new zealand semi finals we gave everything we had virat kohlis emotional post after semi final heartbreak