पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ : पहिल्या चेंडूवर रिव्ह्यू गमावल्यानंतर भुवी झाला ट्रोल

भुवीच्या पहिल्याच चेंडूवर भारताने गमावला रिव्ह्यू

विश्वचषकातील अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी मँचेस्टरच्या मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भुवीच्या पहिल्याच चेंडूवर रिव्ह्यू गमावला. या प्रकारानंतर भुवनेश्वर कुमार ट्रोल होत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलसने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. 

#INDvNZ कुठं नेऊन ठेवलंय शमीला आमच्या, नेटकरी संतापले

पहिल्या चेंडूचा सामना करताना मार्टिन गप्टिल भुवीच्या पहिल्याच चेंडूवर गडबडला. भुवीने पायचितचे जोरदार  केलेले अपील मैदानातील पंचांनी फेटाळून लावले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने सुरुवातीलाच रिव्ह्वू घेतला. रिप्लायमध्ये चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याने पंचांनी गप्टिल नाबाद असल्याचा फायनल निर्णय दिला. आणि त्यासोबतच भारताने पहिल्याच चेंडूवर रिव्ह्यू गमावला. त्यानंतर नेटकऱ्यांनी भुवीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मोहम्मद शमीच्या जागी त्याला संधी का दिली? असा सूरही सोशल मीडियावर उमटल्याचे पाहायला मिळाले. 

न्यूझीलंडच्या डावातील ४५ व्या षटकात भुवीच्याच चेंडूवर रॉस टेलरला पंचांनी पायचित दिले होते. यावेळी टेलरने रिव्ह्यू घेतला. हा निर्णय देखील न्यूझीलंडच्या पारड्यात पडला आणि यशस्वी रिव्ह्यूवने टेलरला जीवदान मिळाले.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India vs New Zealand semi final India lose review on first ball Twitter blames Bhuvneshwar Kumar