पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ : 'धोनी है तो मुमकिन हैं! भारतीय चाहत्यांना अजूनही आस

महेंद्रसिंह धोनी

न्यूझीलंड गोलंदाजांनी भारतीय संघाच्या आघाडीला सुरुंग लावल्यानंतरही भारतीय संघ कमबॅक करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. भारताचे चार गडी माघारी फिरल्यानंतर पंत आणि हार्दिक पांड्या मैदानात खेळत आहेत. पहिला विश्वचषक खेळणारा पंत अगदी कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खेळत आहे. 

या जोडीनं एक चांगली भागीदारी करुन डाव सावरला तर सामना पुन्हा भारताच्या बाजूनं झुकेल, या गृहितावर अनेक क्रिकेट चाहते सामना पाहत आहेत. काही चाहते धोनीचे फोटो शेअर करुन न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धोनी भारताला तारेल, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

न्यूझीलंडने प्रथम फंलदाजी करताना भारतासमोर २४० धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कोण दिसेल याचा कौल हा न्यूझीलंड ३० टक्के तर भारत ७० टक्के असा होता. सामना पेढे सरकल्यानंतर न्यूझीलंड ६० तर  भारत ४० टक्के असा कल पाहायला मिळाला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup 2019 india vs new zealand reserve day match semi final indian fans hop on pant hardik pandya and dhoni