पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WC Point Table : पाऊस एक नंबरी, सोशल मीडियावर प्रतिक्रियांची 'बरसात'

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी तब्बल चार सामन्यांवर पावसाचा प्रभाव पाहायला मिळाल्यानंतर भारत-न्यूझीलँड सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. पावसामुळे सामने रद्द होणे आणि डकवर्थ नियमानुसार सामन्याचा निकाल पाहण्याची वेळ आल्याने क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. चार वर्षांतून एकाद होणारी मोठी स्पर्धा आयसीसीने इंग्लंड आणि वेल्सशिवाय अन्य ठिकाणी आयोजित केली असती तर क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा आली नसती, असा सूरही उमटतोय.

भारत-न्यूझीलँड यांच्यात पावसाने खो घातल्यानंतर काही नेटकरी मजेशीर पोस्ट शेअर करुन पावसाच्या बॅटिंगचा आनंदही घेताना पाहायला मिळते. एकाने तर चक्क विश्वचषकाची गुणतालिका शेअर करत यात पावसाला अव्वल स्थान दिले आहेत. सध्याच्या गुणतालिकेत न्यूझीलँड ६ गुणांसह अव्वल स्थानी असून ऑस्ट्रेलिया ६ गुणांसह दुसऱ्या तर इंग्लंड, भारत प्रत्येकी ४ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. यात त्याने पाऊस ९ गुण मिळवून आघाडीवर असल्याचा उल्लेख केला आहे. 

उल्लेखनिय आहे की, भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील आजचा सामन्यासह आतापर्यंत पाच सामन्यांत पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. विश्वचषकातील ११ व्या सामन्यात  पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना एकही चेंडू न फेकता रद्द करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना अवघ्या काही षटकांचा खेळ झाल्यानंतर रद्द करावा लागला होता. तर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नाणेफेकीशिवायच सामना रद्द करण्यात आला होता. श्रीलंकेला पावसाचा दोन वेळा फटका सोसावा लागला आहे. त्यांनी अफगाणिस्तान विरुद्ध मिळवलेला विजय हा देखील पावसानंतर मिळालेल्या डकवर्थ लुईसच्या नियमानुसार जिंकला होता.