पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ जे अन्य सहकाऱ्यांना जमलं नाही ते विल्यम्सननं करुन दाखवलं

केन विल्यम्सन

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रँफर्डच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सलामीवीरांनी चुकीचा ठरवल्यानंतर कर्णधार विल्यम्सनने स्वत: जबाबदारी घेत संघाला सावरले. यासामन्यात त्याने ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीसह एक नवा विक्रम त्याने आपल्या नावे नोंदवला आहे. न्यूझीलंडकडून विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. 

#INDvNZ : पहिल्या चेंडूवर रिव्ह्यू गमावल्यानंतर भुवी 

सलामीवीर मार्टिन गप्टिलला मागे टाकत त्याने विश्वचषक सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला. २०१६ च्या विश्वचषक स्पर्धेत मार्टिन गप्टिलने ५४७ धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकात केन विलियम्सनने ८ डावात ५४८ धावा करत विश्वचषक स्पर्धेत संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. मार्टिन गप्टिलशिवाय विश्वचषक स्पर्धेत तब्बल दोनवेळा ५०० हून अधिक धावा करणारा विल्यम्सन किवींचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी२००७ च्या विश्वचषकात स्कॉट स्टायरिसने ४९९ तर मार्टिन क्रोने १९९२ च्या स्पर्धेत ४५६ धावा केल्या होत्या.  

#INDvNZ Live : पावसामुळे खेळ थांबला! न्यूझीलंड ५ बाद २११ 

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने ६७३ धावा केल्या होत्या. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०१७ च्या स्पर्धेत ६५९ धावा केल्या होत्या. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा या दोघांच्या विक्रमाचा पाठलाग करत आहे. रोहित शर्माने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यत ६४७ धावा केल्या आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup 2019 india vs new zealand kane williamson broke world cup record of martin guptil