पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC उपांत्य फेरीत भारत-न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंडशी भिडणार

सेमीफायनलच्या लढती ठरल्या

मँचेस्टरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या सामन्यातील निकालानंतर उपांत्य फेरीतील समीकरण स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावल्याने भारतीय संघ १५ गुणांसह अव्वलस्थानी कायम राहिला असून ऑस्ट्रेलियन संघ १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाची नावे यापूर्वीच निश्चित झाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील साखळी फेरीतील अखेरच्या लढतीतील  निकालानंतर पहिले आणि दुसरे स्थान पक्के झाले असून उपांत्य फेरीचे समीकरण स्पष्ट झाले आहे. 

WC #INDvSL: भारताचा विजयी धडाका कायम! लंकेला ७ गडी राखून नमवले

उपांत्य फेरीतील पहिला सामना हा गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या भारत आणि चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडमध्ये मंगळवारी ९ जूलै रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानात खेळवण्यात येईल. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या यजमान इंग्लंड यांच्यात गुरुवारी ११ जूलैला बर्मिंगहॅमच्या एजबस्टनच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामन्यातील विजेते रविवारी १४ जूलैला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लंडनच्या लॉर्डसच्या मैदानात अंतिम सामना जिंकून विश्वजेता ठरण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

#AUSvSA आफ्रिकेने कांगारुंना १० धावांनी हरवले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 India Vs New Zealand First And Australia vs England Second Semi Finals