पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC : रोहितनं पुन्हा एकदा घेतली पत्रकाराची फिरकी

 रोहित शर्मा आणि ऋषभ पंत

विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार रोहित शर्मालाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. विश्वचषकात पहिल्या सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतला हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्या अगोदर संधी का दिली? असा प्रश्न रोहितला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर रोहितने दिलेल्या उत्तराने सर्वांची बोलती बंद केली.   

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने रोहितसमोर प्रश्न उपस्थित करताना म्हणाला की, कोहली बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर पंतला पाठवल्याचे पाहून तुला आश्चर्य वाटले नाही का? यावर रोहितने मजेशीर उत्तर दिले. मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही. कारण तुम्हालाच वाटत होते की पंतने चौथ्या क्रमांकावर खेळावे. 

#ICC WC : कर्णधार कोहलीची धोनीसाठी बॅटिंग

विश्वचषकातील ऋषभ पंतची निवड न होण्यापासून ते धवनच्या जागी त्याची संघात वर्णी लागल्यानंतर तो चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय असल्याचे बोलले गेले. रोहित म्हणाला की, पहिला सामना खेळत असताना त्याला वेळ मिळायला हवा. त्यामुळेच हार्दिक पांड्याऐवजी त्याला संधी देण्यात आली, असेही रोहितने सांगितले. 

चौथ्या क्रमांकासंदर्भात संघात कोणताही संभ्रम नाही. स्पर्धेतील प्रत्येक संघामध्ये प्रतिस्पर्ध्यांनुसार जे अपेक्षित बदल होत आहेत त्याच प्रमाणे आपल्या संघातही बदल होत आहेत, असे तो म्हणाला.

#IndvsPak: पाक पत्रकाराच्या गुगलीवर हिटमॅनचा मास्टर स्ट्रोक