आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील मुख्य लढतीला सुरुवात होण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सराव सामन्यातून संघ खेळपट्टी आणि प्रतिस्पर्धीचा अंदाज घेत आहेत. त्याचवेळी सराव सामन्यातील काही क्षण क्रिकेट चाहत्यांना विश्वचषक स्पर्धेच्या मैदानाकडे आकर्षित करत आहेत. बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात याची प्रचती आली.
किंग कोहलीने उलगडले वैवाहिक जीवनातील रहस्य
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडले. या सामन्यात कर्णधार कोहली त्याच्या शतकाची आतुरतेनं वाट पाहत होता. धोनी ज्यावेळी ९९ धावांवर फलंदाजी करत होता त्यावेळी कोहली चांगलाच नर्वस झाला होता.
Video : माहीने षटकाराने साजरे केले शतक!
कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव तो धोनीच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सहज समजत होते. धोनीने जेव्हा षटकार खेचला त्यावेळी धोनी आणि त्याच्या चाहत्यांपेक्षा विराटलाच अधिक आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानवरील बाल्कनीत उभ्या असलेल्या विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी उभे राहून धोनीच्या खेळीला सलाम केला. यात कोहलीचा अंदाज अधिकच आकर्षित करणारा होता. हा फक्त ट्रेलर होता विश्वचषक स्पर्धेत आपल्याला असे अनेक क्षण अनुभवायची संधी मिळणार आहे, यात काहीच शंका नाही.