पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : #INDvBAN शमीच्या धुलाईनंतरची अप्सरा सोनालीची रिअ‍ॅक्शन!

सोनाली कुलकर्णी

बर्मिंगहॅमच्या मैदानात रंगलेला सामना पाहण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील हजेरी लावली होती. या सामन्यात बांगलादेशच्या डावातील शमी घेऊन आलेल्या ३८ व्या षटकात शैफुद्दीनं आणि शब्बीरने  शमीची चांगलीच धुलाई केली. दोघांनी प्रत्येकी दोन-दोन चौकाराच्या मदतीने या षटकात १७ धावा लुटल्या. यावेळी सोनालीच्या चेहऱ्यावरी रंग अक्षरश: उडाला.

Video : #INDvBAN हिटमॅनच्या शतकानंतर आजीबाईंच सेलिब्रेशन

या वेळी प्रेक्षक गॅलरीतून सामना पाहणारी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या चेहऱ्यावरी भाव पाहण्यासारखा होता. शम्मीच्या धुलाई वेळी तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. शमीच्या षटकातील सोनालीची  रिअ‍ॅक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

#INDvBAN 'जबरा फॅन' आजीबाईंच्या प्रार्थनेची कहाणी!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या इंग्लंडमध्ये असून भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला तिने बर्मिंगहॅमच्या एडबॅस्टन स्टेडियमवर हजेरी लावली होती. सामना जिंकल्यानंतर ती खूपच आनंदी दिसली. तिने तिच्या इन्टा अकाउंटवरुनही काही फोटो शेअर केले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 india vs bangladesh Sonalee Kulkarni watching indias match watch video