पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC #INDvBAN : रोहितला संधी म्हणजे शतकाची नांदी!

रोहित शर्मा

बर्मिंगहॅमच्या मैदानात बांगलादेश विरुद्ध शतक झळकावत रोहित शर्माने विक्रमी शतक झळकावले. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील २६ तर यंदाच्या विश्वचषकातील चौथे शतक आहे. या शतकी खेळीसह विश्वचषकामध्ये सर्वाधिक चार शतक झळकवणाऱ्या संगकाराच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. एका विश्वचषकात सर्वाधिक चार शतके करण्याचा विक्रम संगकाराच्या नावे आहे.  

विश्वचषकामध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विक्रमादित्य सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने विश्वचषकात ६ शतके झळकावली आहेत. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींगचा नंबर लागतो. पॉन्टिंगने विश्वचषकात ५ शतके झळकावली आहेत. श्रीलंकेचा माजी सलामीवीर कुमार संगकारा ५ शतकांसह तिसऱ्या तर रोहित शर्मा ५ शतकासह चौथ्या स्थानावर आहे. 

ICC WC #INDvBAN : कार्तिकचा वर्ल्ड कपमधील पहिला 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अवघ्या एका धावेवर जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्माने १२२ धावांची खेळी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४ धावांवर खेळत असताना जो रुटने रोहित शर्माचा झेल सोडला होता. त्यानंतर रोहितने १०२ धावांची खेळी केली. होती. पाकिस्तानी खेळाडूंनीही रोहितला धाव बाद करण्याची संधी दवडली होती. या सामन्यातही त्याने शतकाला गवसणी घातली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 india vs bangladesh rohit sharma slams 4th world cup ton equals sangakkara s massive record