पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

विराट कोहली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारतीय फलंदाजी खऱ्या अर्थाने बहरलेली दिसली. आघाडीच्या फलंदाजांनी भक्कम सुरुवात केल्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियासमोर ३५२ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात सलामीच्या जोडीनंतर विराटनेही एक खास विक्रम आपल्या नावे केला. 

धवनची पॉन्टिंग-संगकाराशी बरोबरी, सचिन-सौरवच्या एक पाऊल दूर

कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२९ वे अर्धशतक झळकावत कर्णधाराला साजेसा खेळ केला. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने ९१ व्या वेळी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक धावा सर्वाधिकवेळा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने १४५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. 

क्रिकेट टीम तयार करण्यास भारत मदत करेल, मालदीवला अपेक्षा

यात कुमार संगकारा ११८, ऑस्ट्रेलियन रिकी पॉन्टिंग ११२ आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस १०३ वेळा एकदिवसीय सामन्यात ५० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.