पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#IndvsAus Record: जे सचिनला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं

रोहित शर्मा

विश्वचषकाच्या बाराव्या हंगामातील १४ व्या सामन्यात भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कमालीचा विक्रम प्रस्थापित केला. कांगारुंविरुद्धच्या कामगिरीने त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर वैयक्तिक २० धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २ हजार धावांचा टप्पा पार केला.

 

ICC WC 2019, IndvsAus : गब्बरच्या खेळीनंतर भारताचा जबरदस्त विजय

कागांरुविरुद्ध सर्वात जलदगतीने २ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने अव्वलस्थान पटकावले आहे. ३७ डावात रोहितने हा पराक्रम करुन दाखवलाय. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक जलद २ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने एकदिवसीय सामन्यातील ४० डावात हा पल्ला गाठला होता. त्याने वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्डसन यांना मागे टाकले होते. 

ICC WC 2019 : भारताच्या सलग दुसऱ्या विजयामागची पाच 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यात सर्वात जलद २ हजार धावांचा पल्ला गाठणारे फलंदाज 

  • रोहित शर्मा- ३७ डाव (ऑस्ट्रेलिया)
  • सचिन तेंडुलकर- ४० डाव (ऑस्ट्रेलिया)
  • विवियन रिचर्ड्स- ४५ डाव (ऑस्ट्रेलिया)
  • विराट कोहली- ४४ डाव (श्रीलंका)
  • महेंद्रसिंह धोनी-४५ डाव (श्रीलंका)