पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीनं तो विषयच संपवला!

महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 'बलिदान बॅज' वरुन उठलेल्या वादग्रस्त चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने सैन्यदलाच्या बलिदानाचे प्रतिक असलेले चिन्ह (बलिदान बॅज) वापरल्याच्या मुद्द्यावर क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. 

DhoniKeepTheGlove : ग्लोव्हजसाठी बीसीसीआयनं आयसीसीकडे मागितली परवानगी 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) यासंदर्भात आक्षेप नोंदवत धोनीने ग्लोव्ह्जवरील चिन्ह (बलिदान बॅज) काढावे अशी विनंती बीसीसीआयकडे केली होती. आसीसीच्या या भूमिकेला बीसीसीआयने प्रत्त्युत्तर दिले होते. आम्ही धोनीच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका घेत त्यांनी धोनीला बलिदान बॅज वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. 

विराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

ही मागणी आयसीसीने फेटाळल्यानंतर धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आजच्या सामन्यात धोनी यासंदर्भात काय भूमिका घेणार यासंदर्भातही चर्चा रंगली. मात्र, आज धोनी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर सलामीच्या सामन्यात दिसलेले चिन्ह दिसले नाही. आयसीसीच्या नियमांचे पालन म्हणूनच धोनी ग्लोव्ह्जवरील चिन्ह (बलिदान बॅज) काढूनच यष्टिरक्षणासाठी मैदानात उतरला होता. या भूमिकेतून एका अर्थाने धोनीने ग्लोव्ह्जच्या वादाचा विषयच संपवला आहे.