पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेंडू कुरतडल्याच्या चर्चेवर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा खुलासा

लंडन येथील ओव्हलच्या मैदानावर रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झम्पाने चेंडू कुरतडण्याचा प्रकार केल्याची टिवटिव नेटकऱ्यांनी सुरु केली होती. यासंबंधातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. याबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने पुढे येऊन खुलासा केला आहे. 

भारतविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू मैदानावर चेंडूसोबत छेडखानी करत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाभोवती पुन्हा एकदा बॉल टेंम्परिंगचा आरोप घोंगवताना दिसला. सामन्यादरम्यान झम्पा ट्राऊजरच्या खिशातून बॉलला काहीतरी घासत असल्याचे पाहायला मिळाले. व्हायरल व्हिडिओवर वेगाने येणाऱ्या प्रतिक्रियानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंचने पुढे येत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. झम्पाकडे सँडपेपर नसून तो हँडवार्मर असल्याचे सांगत त्याने बॉल टेम्परिंगच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

जबरदस्तीने आला अन् 'जबराट' नाव करुन थांबला!  

भारताच्या डावातील चौदाव्या षटकादरम्यान झम्पा खिशातून बॉलला काहीतरी घासत असल्याचे पाहायला मिळाले होते. झम्पाने सामन्यादरम्यान दोनवेळा असा प्रकार केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या या कृत्याचा संबंध गतवर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये घडलेल्या बॉल टेंम्परिंगच्या प्रकरणाशी जोडत ऑस्ट्रेलियाच्या जुन्या आणि वेदनादायी आठवणीला उजाळा देण्यास सुरुवात केली होती.सामनाधिकारी आणि आयसीसीने यावर कोणतीही विचारणा अथवा कारवाई केलेली नाही. तसेच फिंचने स्पष्टिकरण देत वादाला पूर्णविराम दिला आहे.  
२०१८ मध्ये केपटाऊनच्या मैदाना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या  कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ, उप-कर्णधार वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्राफ्ट यांच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप झाला होता. याप्रकरणात तिघांना कठोर शिक्षाही सुनावण्यात आली होती.  

युवीने नाकारली होती BCCI ची रिटायरमेंट मॅच ऑफर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India vs Australia Aaron Finch dismisses ball tampering claims on Adam Zampa says leggie used hand warmer