पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-पाक 'वर्ल्ड कप-मेगा शो' ४८ तासांत 'हाऊसफुल्ल'

भारत-पाकिस्तान 'वर्ल्डकप मेगा शॉ हाऊसफुल' (Getty Images)

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील नियोजित सामन्याचा मेगा शो अवघ्या दोन दिवसांत हाऊसफुल्ल झाला आहे. ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत १६ जूनला मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफॉर्डच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत नियोजित आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आगामी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध एकही सामना खेळू नये, अशी प्रतिक्रिया उमटली होती. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघावर या स्पर्धेत बंदी घालावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे (आयसीसी) केली होती. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीही क्रिकेट चाहते दोन्ही संघातील सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघातील सामन्याची तिकीट विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत संपूर्ण तिकीटांची झालेल्या विक्रमी विक्रीतून हे स्पष्टपणे दिसून येते.   

केदारला दुखापत, रायडू थ्रीडी गॉगल्सची ऑर्डर रद्द करणार?

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानपेक्षा वर्चढ राहिला आहे. आतापर्यंत एकाही विश्वचषकात भारताने पाकिस्तानला जिंकण्याची संधी दिलेली नाही. (एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकांचा यात समावेश आहे.) विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियशिप चषकातील अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला पराभवाचा धक्का दिला होता.  त्यानंतर आशियाई चषकात भारताने पाकिस्तानला ९ गडी राखून एकहाती पराभूत केले होते. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ इतिहासाची पुनरावृत्ती करणार की पाकिस्तान विश्वचषकातील भारता विरुद्धची कामगिरी सुधारणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.   

विश्वचषकात भारतीय संघ डोळ्यासमोर ठेवून लढू: सरफराज