पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ टीम इंडियाचे तीन तेरा! यशस्वी त्रिकुट माघारी

रोहित, लोकेश राहुल, कोहली बाद

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय आघाडीच्या फलंदाजांना तंबूत पाठवत भारताला बॅकफूटवर टाकले आहे. विशेष म्हणेज रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल प्रत्येकी एक धाव करुन माघारी फिरले आहेत. मॅट हेन्रीने रोहित शर्माला लॅथमकरवी झेलबाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर बोल्टने कर्णधार विराट कोहलीला पायचित करत भारताला मोठा धक्का दिला. दबावात असलेला लोकेश राहुलही लॅथमच्या हातात झेल देवून माघारी फिरला. 

आघाडी फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यामुळे भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला आहे. आतापर्यंत भारतीय संघाच्या विजयात त्रिकुटाच्या खेळीचा महत्त्वपूर्ण वाटा होता. यंदाच्या स्पर्धेत विक्रमी शतकांची नोंद करणाऱ्या रोहित शर्माकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. स्पर्धेतील साखळी सामन्यात त्याने लोकेशसोबत विक्रमी भागीदारी रचली. पण उपांत्य सामन्यात या जोडीला एक दमदार सुरुवात देता आली नाही. 

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सर्वांच्या आशा या कर्णधार विराट कोहलीवर होत्या. मात्र कोहलीही स्वस्तात माघीर फिरला. भारतीय संघाच्या मध्यफळीतील हार्दिक पांड्या आणि धोनी वगळता अन्य कोणाला मैदानात तग धरण्यात यश आलेले नाही त्यामुळे न्यूझीलंडने दिलेले २४० धावांचे लक्ष्य भारतीय संघ पेलणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 India New Zealand Semi final Reserve Day Rohit Sharma Lokesh Rahul Virat Kohali Fail