पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : #IndvsPak: पाक पत्रकाराच्या गुगलीवर हिटमॅनचा मास्टर स्ट्रोक

रोहित शर्मा

भारतीय संघाचा उप-कर्णधार आणि ज्याच्या शतकी खेळीनंतर द्विशतकाची आस लागून राहते त्या हिटमॅन रोहित शर्माची बॅट पाक विरुद्ध पुन्हा एकदा तळपली. रविवारी मँचेस्टरच्या मैदानात शतकी खेळी करुन त्याने पाकिस्तान विरुद्ध सातत्यपूर्ण शतकी खेळी करण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या फलंदाजीने प्रभावित झालेल्या पाकच्या पत्रकाराने सामन्यानंतर रोहितला पाकच्या संघातील फलंदाजीच्या समस्येसंदर्भात एक खास प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. 

पाकिस्तानी फलंदाज सध्या बिकट अवस्थेतून जात आहे.  या परिस्थितीत सहकारी म्हणून तू पाक फलंदाजांना कोणता सल्ला देशील? असा प्रश्न पत्रकाराने रोहित शर्माला विचारला होतो. यावर रोहितने गंमतीशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, "जर मी पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक झालो तर मी त्यांनी निश्चत सल्ला देईन. पण आता मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही." यासंदर्भातील व्हिडिओ ईएसपीएन क्रिकइन्फोच्या इन्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.  

ICC WC 2019 : पाक विरुद्ध रो'हिट' शर्माचे विक्रमी शतक

पाकिस्तान विरुद्धच्या 'हाय-होल्टेज' सामन्यात रोहित शर्माने १४० धावांची खेळी केली होती. जेव्हा-जेव्हा रोहित शर्मा शंभरीचा टप्पा पार करतो तेव्हा-तेव्हा त्याच्या द्विशतकाच्या चर्चेला सुरुवात होते. शतकी खेळीनंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये द्विशतकाची भावना निर्माण करण्याची किमया साधणारा रोहित शर्मा हा क्रिकेट जगतातील एकमेव फंलदाज आहे. पाक विरुद्धच्या सामन्यातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण अखेरच्या षटकात धावगती वाढवण्याच्या नादात तो झेलबाद झाला होता.   

#IndvsPak : रनमशीन कोहलीची विश्व विक्रमाला गवसणी