पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

असा 'जबरा फॅन' पाहिला नाही, विराटनं घेतले आजींचे आशीर्वाद

विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी रंगलेला भारत विरुद्ध बांगलादेश सामना भारतानं जिंकला. हा सामना भारतानं जिंकावा यासाठी मैदानात उपस्थित असलेले हजारो चाहते प्रार्थना करत होते. या चाहत्यांमध्ये  ८७ वर्षांच्या  चारूलता आजींनं सर्वांचं लक्ष वेधलं. इतकं वय असूनही चारूलता  आजींचा उत्साह हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व तरूण वर्गाला लाजवेल असाच होता. विशेष म्हणजे व्हिल चेअरवर बसून त्या भारतीय संघाला चेअरअप करत होत्या.

सामना जिंकल्यानंतर  भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहोलीनं थेट आजींचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेला. प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये जाऊन विराटनं आजींचे आशीर्वाद घेतले. भारतानं हा सामना जिंकल्यानंतर विराटनं ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले, पण त्याचबरोबर चारूलता  आजींचे विशेष आभार मानले. मी तिच्यासारखा चाहता यापूर्वी कधीही पाहिला नाही असं म्हणत विराटनं आजींसोबतचा फोटो शेअर केला. 

चारूलता या  केवळ सामना पाहत नव्हत्या तर त्या सामन्यादरम्यान घडणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील आपल्या डायरीत करत होत्या. भारतीय संघाला विजय मिळावा यासाठी त्यांनी गणेशाला साकडं घातलं होते. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकला, तो सामना देखील मी स्टेडीयममध्ये जाऊन पाहिला होता, अशी आठवणही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितली. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Icc World Cup 2019 IND vs BAN virat kohli take blessing of 87 Years Old Woman Fan Charulata Patel