पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीने ग्लोव्ह्जवरील 'बलिदान चिन्ह' काढावे, ICC ची विनंती

महेंद्रसिंह धोनी

विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या  ग्लोव्ह्जने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने पॅरा स्पेशल फोर्स'चे ‘बलिदान चिन्ह’ असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. 'पॅरा स्पेशल फोर्सशी संबंधित व्यक्तींनाच हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. भारतीय क्रिकेट चाहते त्याच्या या अंदाजाचे फॅन झाले असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने धोनीच्या ग्लोव्ह्जवरील चिन्ह काढण्याची विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाकडे केली आहे. 

...मग धोनीच्या ग्लोव्ह्जची चर्चा तर होणारच

आयसीसीचे महाव्यवस्थापक क्लेयर फर्लोंग म्हणाले की, आम्ही धोनीच्या ग्लोव्ह्जवरील चिन्ह काढण्यासंदर्भात बीसीसीआयला विनंती केली आहे. आयसीसीच्या नियमावलीनुसार, सामन्यादरम्यान राजकीय, धार्मिक किंवा अन्य संदेश प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच धोनीने 'बलिदान चिन्ह' असलेले ग्लोव्ह्ज सामन्यादरम्यान वापरू नये, असे आयसीसीने म्हटले आहे.

ICC WC 2019 : भारताच्या विजयामागची पाच कारणे

भारतीय लष्कराने २०११ मध्ये  महेंद्रसिंह धोनीला  लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल केली होती.  यावेळी धोनीने पॅरा ब्रिगेडच्या अंतर्गत प्रशिक्षणही घेतलं होते. धोनी भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेलं ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.