पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुंदर पिंचाईंचा क्रिकेट स्ट्रोक, वर्ल्ड कप फायनलबद्दल केली भविष्यवाणी

'गुगल' CEO सुंदर पिंचाई

'गुगल'चे सीईओ सुंदर पिंचाई यांनी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेबद्दल भविष्यवाणी केली आहे. आयसीसीच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले इंग्लंड आणि भारत यांच्यात अंतिम सामना पाहायला मिळेल, असे ते म्हणाले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय संघ विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

वाशिंग्टन येथील यूएस-इंडिया बिझनेस काउंसिलच्या कार्यक्रमात यूएसआयबीसीच्या अध्यक्षा निशा देसाई यांनी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोणते दोन संघ पात्र ठरतील, असा प्रश्न पिचाई यांना विचारला होता. यावर ते म्हणाले की, आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना रंगेल. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ उत्तम असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.  

स्वत: क्रिकेटचे चाहते असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आयुष्यातील खेळासंदर्भातील अनुभव देखील शेअर केला. ते म्हणाले की "जेव्हा मी अमेरिकेत आलो त्यावेळी मला बेसबॉल खेळणे आव्हानात्मक वाटले. बेसबॉलच्या मैदानात पहिला सामना खेळताना मी एक उत्तम फटका मारल्याचे आठवते. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. क्रिकेटमध्ये तो चांगला फटका ठरला असता, पण माझ्या फटकेबाजीचे फारसे कौतुक झाले नाही." क्रिकेटमध्ये धाव घेताना आपण बॅटसोबत घेऊन धावतो. बेसबॉलमध्ये मी त्याप्रमाणेच धावलो होतो, हा किस्सा देखील त्यांनी शेअर केला.