पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या निवृत्तीवर मॅग्राची 'मन की बात'

मेग्राने धोनीच्या निवृत्तीबद्दल व्यक्त केले मत

भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मर्यादित षटकांतील खेळात संघाचा महत्त्वपूर्ण हिस्सा असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर 'ग्लेन मॅग्राने व्यक्त केले. धोनीला जोपर्यंत खेळाचा आनंद घेता येईल तोपर्यंत त्याने खेळत रहावे, असे सांगत धोनीने निवृत्तीचा विचार करु नये, असा सल्लाच मेग्राने दिला.  

धोनीचे घरचे मैदान असलेल्या रांचीच्या युवा गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी झारखंड राज्य क्रिेकेट संघाने आयोजित केलेल्या शिबीरासाठी मॅग्रा रांचीमध्ये आहे. त्यावेळी त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत धोनीने निवृत्तीचा विचार करण्याची वेळ नाही, असे म्हटले आहे.  
मॅग्रा म्हणाला की ' सध्या क्रिकेट वर्तुळात धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. परंतु धोनीने तोपर्यंत खेळावे जो पर्यंत त्याला खेळात आनंद मिळत आहे.  दिग्गज मॅग्राने ५६३ कसोटी आणि ३८१ एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

ICC WC 2019 : बीसीसीआयचा रिव्ह्यू फेल! धवन 'आउट' पंत 'इन'

विश्वचषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात धोनीने ३४१ वा सामना खेळला. या सामन्यात मैदानात उतरताच त्याने भारताकडून सर्वाधिक वनडे सामन्यात प्रतिनिधीत्व करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील राहुल द्रविडला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. सचिनने ४६३ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

एकदिवसीय सामन्यात गेल्या दोन वर्षापासून त्याच्या स्टाइक रेट ७८ एवढा आहे. जो कारकिर्दीच्या स्ट्राइक रेटपेक्षा ८७ पेक्षा कमी आहे. पण आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना धोनीने आजही तो वेगाने धाव करण्याची क्षमता बाळगून असल्याचे दाखवून दिले होते. विश्वचषक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने १४ चेंडूत २७ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.  

रवी शास्त्रींनी चाहत्यांना दाखवली धोनीची जर्सी